भूकंप

Started by Asu@16, January 13, 2018, 11:53:39 AM

Previous topic - Next topic

Asu@16

    भूकंप

शांत पर्वत उद्रित झाला
अघटित सारे घडले
न्यायालयी भूकंप झाला
जग सारे हादरले

तडे गेले लोकशाहीला
मंत्रालय, संसद हादरली
धक्के अजून किती बसणार
जनता सारी बावरली

भूकंप केंद्र शोधिती तज्ज्ञ
न्यायालयी की ? दरबारी ?
कुणा कळेना सारेच अज्ञ
अविरत चर्चा चॅनेलवरी

न्यायाविरुद्ध न्यायाचा
संघर्ष पेटला जगण्याचा
न्यायदेवता आंधळी झाली
तराजू गळून पडला खाली

पाहून लाव्हा भ्रष्टाचाराचा
देवता पळाली न्यायालयातून
न्याय मागावा कुठे कळेना
व्यवस्था गेली कामातून

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita