Tu...

Started by प्रियंका, January 13, 2018, 11:59:14 AM

Previous topic - Next topic

प्रियंका

पाहिले नाही कोण आहेस कसा आहेस तू
पण जसा आहेस तसा,फक्त माझा आहेस तू

तुझ्या नजरेत पाहता प्रेमाचा भास आहेस तू
तुला पाहून मला लाजवणारा आभास आहेस तू

गोड बोलणे तुझे मला भुरळ पडणारा असा तू
माझ्या कवितेला नवीन उजाळा देणारा असा आहेस तू

पाहिले नाही तरी जुना जवळचा माझा कोणीतरी वाटतोस तू
दूर असून माझ्या पासून मनाच्या जवळ आहेस तू

भेटशील ना जेव्हा हातात हात घेशील का रे तू ?
मी तर साथ देईल तुझी
 पण
माझा जीवनसाथी होशील का रे तू ?


{{ प्रियंका }}