तुझी आठवण

Started by Asu@16, January 13, 2018, 12:03:09 PM

Previous topic - Next topic

Asu@16

तुझी आठवण

भेटणे नाही, बोलणे तरी !
तुझ्यापेक्षा तुझी
आठवण बरी.
रुसणे नाही, फुगणे तरी !
बोलावल्या बरोबर,
क्षणात घरी.
राग नाही, लोभ तरी !
निरोप दिल्यावर,
क्षणात दारी.
हसणे नाही, रडणे तरी !
आठवण गेल्यावर,
आठवणींच्या सरी.
       तुझ्यापेक्षा तुझी
       आठवण बरी.

- अरुण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita