हृदय

Started by Jayk6913, January 14, 2018, 09:19:43 AM

Previous topic - Next topic

Jayk6913

हृदयाची भाषा हृदयाला न सांगताच समजली,
प्रीत तुजी प्रिये या मनास नकळत उमजली...
वाट तुझी पाहुनी सूर्यास्त झाला,
भेटीसाठी तुझ्या जीव आतुर झाला...
दुरावा हा आपला संपता संपेना,
वाट पाहून तुझी हे नयनही मिटेना...
पाहताच तुजला अश्रुंचे ओघळ येति,
थेंब होऊनि त्याचे दुःख दूर जाती...
मन आज ना माझे राहिले,
हरवले कुठे जेव्हा तुला पाहिले...
प्रेमात तुझ्या जग हे सुंदर दिसले,
पाहताच तुला फुलपाखरू ही गालात हसले...
||जय||