आठवण

Started by Jayk6913, January 14, 2018, 09:26:26 AM

Previous topic - Next topic

Jayk6913

एका संध्याकाळी तुझी खूप आठवण आली
तुझी आठवण नाही येऊ द्यायची म्हणून
मग मी एक मेणबत्ती पेटवली
आणि तिच्याकडे एक टक पाहत बसलो
पण ती मेणबत्ती पण काय निघाली
तिच्या धुरात तुझा चेहरा तयार झाला
आणि तुझी आठवण तशीच मनात रुजून राहिली
||जय||