मला जमलेच नव्हते

Started by कदम, January 15, 2018, 11:36:54 AM

Previous topic - Next topic

कदम


कसे बोलायचे साजणीला,
मला जमलेच नव्हते
काय बोलायचे तिला,
मला समजलेच नव्हते ...

जमेल तसे करायचो प्रेम,
तिला वागणे माझे आवडलेच नव्हते
कसे करावे प्रेम तिच्यावर,
मन ऐवढे कधी अवघडलेच नव्हते ...

जिवापाड केला जपायचा प्रयत्न नातं,
स्वतःला ऐवढे कधी जपलेच नव्हते
असं करू का तसं करू,
मला प्रेमात कशाचे भानच नव्हते ...