माझी कविता

Started by Monali Gedekar, January 20, 2018, 08:29:17 PM

Previous topic - Next topic

Monali Gedekar

असं कसं हे एक मन असतं,
वार्‍याच्या झुळुकेप्रमाणे अबोल असत,
न बोलताच सगडं कळत असतं,
पण सगळं कळून सुदधा वळत नसतं........

मनाची हुशारी त्याच्याइतकीच शहाणी,
घालू कशी आता त्याला खत-पाणी,
होकार असा मनी माझ्या दरवळतो,
नकार तर सर्वांगीच नकोसा वाटतो.........

एका मनाचा स्विकार हा दुसर्‍या मनाचा साकार,
असं मन मनाशीच गुणगुणतो...........

आणि शेवटी एकच म्हणतो,
दिलीस तू शब्दांना लयबद्ध साथ,
अगं, आतातरी स्वताला प्रेमापुढे टाक,
तूही एक पाऊल पुढे आता सार,
आणखी किती बघू तुझ्या सोबती मनाची वाट.........???