मनात डोकावून बघाव

Started by suryawanshirohit28, January 23, 2018, 01:15:22 AM

Previous topic - Next topic

suryawanshirohit28

असतात ना काही  लोक  मनात  खूप काही साठवून  ठेवणारे  , अबोल,
अगदी  कमीच व्यक्त होणारे,
काय चाललंय त्यांच्या मनात  कुणालाच नकळणारे ;
त्याचंच मन समजून घेण्याचा प्रयत्न

 


वाटत कधी तरी, त्यांच्या ही मनात डोकावून बघाव;
काय चाललंय त्यात, आपण स्वतःहून च समजुन घ्यावं.

भिन्न भाव त्यांचे, भिन्न त्यांचे अर्थ;
कधी नाही केला अट्टहास, समजून घेईल का कुणी सर्व.

तीक्ष्ण कटाक्षाने खुनावलेलं चुकीचं वर्तन;
तर कधी अश्रूंच्या मागे लपलेली तळमळ.

भाव त्यांच्या डोळ्यातले, आपसूकच व्यक्त होत जातात;
समजण्या पलीकडे ही, अस्तित्व स्वतःचे सिद्ध करतात.

या हावभावांना मलाही, जरा समजता यावं ;
एकदा तरी त्यांच्या मनात, नक्की डोकावून पाहावं..


रोहित सूर्यवंशी, नाशिक
9767717036
रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036