कष्टाची कहाणी

Started by Pravin Dongardive, January 23, 2018, 01:09:54 PM

Previous topic - Next topic

Pravin Dongardive

  कष्टाची कहाणी

चीडीच्या उजेडात पुस्तकाची,
संस्काराने भरलेली पानं चाळतांना.
मायनं पाठीवर फिरवलेला हात,
अन बापाची शाबासकी मिळतांना.
मनाला एक नवी उब अन,
विलक्षण प्रेरणा मिळायची.
भाकरीची फिकीर सदा असतांना
माय कष्टाच्या धारा गिळायची.
आभाळाच्या आरशात बाप,
रोजच कोरं नशीब पाहायचा.
पण मला एकदा पाहिल्यावर,
ओठावर गोड हसत राहायचा.
दु:ख लपवून खोल काळजात,
कोरड्या मातीच्या ढेकळात राबायचा.
विस्कटल्या जरी जगण्याच्या वाटा,
तरी माझी वाट बनून राहायचा.
हरवलेल्या जुन्या आठवणी त्यांच्या,
चला आपण सदैव शोधत राहू.
मायबापाच्या कष्टाची कहाणी हि 
आयुष्यभर त्यांना जपत राहू.         
               प्रविण डोंगरदिवे
               ८८८८१७६१८४