आठवणीनं मधला पाऊस

Started by प्रियंका, January 28, 2018, 12:51:18 PM

Previous topic - Next topic

प्रियंका

खूप दिवसांनी आज आभाळ भरून आलं
तुझ्या आठवणींमध्ये माझे पावसात भिजणं झालं

रिमझिम पावसाचा प्रत्येक थेंब पडू लागला
तुझ्या गोड शब्दांचा आवाज कानी गुणगुनू लागला

पडणाऱ्या पावसात तुझे भास होऊ लागले
तुझ्या आठवणींमध्ये मी तुझीच होऊ लागले

बघ शेवटी आज

तुझी आठवण पाऊसप्रमाणे आली
रिमझिम करत माझ्या मनात सगळी कडे बरसू लागली .

{{ प्रियंका }}