कवीचे गर्भारपण

Started by Asu@16, January 28, 2018, 07:37:58 PM

Previous topic - Next topic

Asu@16

कवीचे गर्भारपण

कवितेचे बीज जेव्हा
मनाच्या गाभाऱ्यात पडते
शरीर होते सैराट आणि
झपाटलेले 'झाड' बनते.
हृदयात तळमळ, पोटात मळमळ
डोक्यात खळबळ, अंगात सळसळ
दाही दिशी दिसती मृगजळं
लक्षणं दिसती तशीच अवखळ
गर्भारपणाचे कडक डोहाळे
रात्रंदिनी ना मिटती डोळे
प्रसूतीचा समय येता,
क्षणोक्षणी दिसती बाळे
जीवघेण्या कळा सोसून,
कविता जेव्हा कुशीत येते.
आनंदाचा पान्हा फुटून,
आई जणू खुशीत न्हाते.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita