मधली सुट्टी

Started by Dnyaneshwar Musale, January 31, 2018, 09:32:08 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale



कधी कट्टी तर
कधी बट्टी ती म्हणजे
मधली सुट्टी.

त्याच सुट्टीत तुझ्याझी बोलावं पण
तु किती ग असायची
हट्टी,
मग तुझ्या एका स्माईल साठी
माझी तोंडाची वाजायची शिट्टी.

त्याच मधल्या सुट्टीत
एक दिवस लिहलेली
मी तुझ्यासाठी चिठ्ठी
मग लालबुंद होऊन
पाठीवरती सरांची बसलेली
अजुन ही आठवते पट्टी.

तुझ्याशी बोलावं म्हणुन मधल्या सुट्टीत
तुझ्या मैत्रिणीशी केलेली गट्टी,
अनं तुझ्या माघ माघ फिरून
माझी शाळेला कायमची झालेली सुट्टी,


पण खरं सांगु तुझ्या एवढीच
आजही आवडते मला मधली सुट्टी,
पण फरक एवढाच पडला की मधली सुट्टी
झाली की तेव्हा तु आठवायची,
आणि आता तु आठवली की सुट्टी  होते.