मन

Started by शिवाजी सांगळे, February 02, 2018, 03:49:15 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मन

आपलंं मन,
भाव भावनांचा ठेवा
कधीच थाऱ्यावर नसलेलं,
तरी जगताना, आपण...
भासवतो, स्थिर आहे असं...
अखंड विचार चक्रात
गुंतलेलं हे मन,
विवेक सोडून
काहीबाही विचार करतं,
त्यात असते
स्वत्व:ची प्रबळ भावना...
तीच्या मुळेच
षड्रिपू डोकं वर काढतात
आणि
काही प्रमाणात
विनाशाला कारण होतात...

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९