एक कळी …..

Started by Asu@16, February 04, 2018, 12:30:18 AM

Previous topic - Next topic

Asu@16

एक कळी .....

सुंदरशी एक कळी
गंधवती नाजूक बाळी
वाऱ्यासंगे डुलत होती
हसत होती खेळत होती
रंगबिरंगी स्वप्नेही उद्याची
मनामध्ये फुलली नव्हती
वाऱ्या अंगी येता कली
पाकळी पाकळी विस्कटून गेली
कळी असहाय कुठे हरवली
कुणा न कळे कुणी लपविली
निर्लज्ज वारा हसतो गाली
भर बगीची लुटून गेली
मन दुभंगले, नाट्य रंगले
माता-पित्याचे स्वप्न भंगले
काळ सरला, शांत सगळे
झाडा झुडपा काहीना वेगळे
रात्र झाली पहाट खुलली
जगरहाटी नाही बदलली
बाग बगीेची फुले उमलली
एक कळी कधी ना फुलली.

-अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita