वेदना !!

Started by श्री. प्रकाश साळवी, February 06, 2018, 06:02:23 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी


वेदना !!
--------
सलत्या वेदनांचा हृदयात वार आहे
जगण्यास जीवनाला माझाच भार आहे
**
श्वासास अजूनही येतो गंध मोगऱ्याचा
माझा मला ही वाटे परकाच फार आहे
** ०१
जाती, पंथ, भाषा नांदती या घरात माझ्या
या भरल्या घराचे उघडेच दार आहे
** ०२
सुकल्या आसवांचे ओघळ दावू कसे मी!
माझा बरा असे मी;  हृदयात गार आहे
** ०३
कुठे दिवस सुखाचे हे कुठे नोटबंदी
बघता वाटते हा खूळा कारभार आहे
** ०४
कर्म आपुले करावे यालाच देव माना
गीता ग्रंथ माझा हेच गीतेचे सार आहे
** ०५
घाव तुझ्या फुलांचे ग जपून ठेवले मी
तुझ्या वेदनेला भरजरी किनार आहे
** ०६
श्रध्दा जपून ठेवा अंधश्रध्दा ही नसावी
एकविसाव्या शतकातही अंधार आहे
** ०७
आदी शक्ती ही तू महामाया ही जगताची
तरीही का हो भ्रूणहत्येचा बाजार आहे ?
** ०८
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
०९-१०-२०१७