एकला

Started by Asu@16, February 10, 2018, 02:11:09 PM

Previous topic - Next topic

Asu@16

    एकला

स्पर्धा माझी माझ्याशी
मार्ग माझा एकला
हारजीत तुमच्यासाठी
लढत राहणे मला
साथ नाही संगत नाही
रस्ता असा वाकडा
संग असुनि संसारी
रंग माझा वेगळा
सावलीची आस नाही
उन्हाचा सहवास हवा
राजमार्ग भला तुम्हा
शोधितो मी मार्ग नवा
जायचे कुठे माहित नाही
चालणे धर्म माझा
थांबतील पावले जेथे
तोच अंतिम स्वर्ग माझा
खेद नाही खंत नाही
जगण्याची तक्रार नाही
पांघरूनि कफन माझे 
मुक्तीची मी वाट पाही.

-अरूण सुका पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita