माया जगाची नाटकी ! (गझल)

Started by श्री. प्रकाश साळवी, February 11, 2018, 10:52:57 AM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

वृत्त : मेनका
लगावली : गालगागा/गालगागा/गालगा

माया जगाची नाटकी ! (गझल)
------------------------------
सोड रे माया जगाची नाटकी
तोड रे आशा मनाची नाटकी
**--**
हे तुझे साथी सगे नात्यातले
जाण तू भाषा तयाची नाटकी
**१**
मागती हो हात जोडूनी मते
काय सेवा सेवकाची नाटकी
**२**
खेळ खेळी मूषकाला मारण्या
देख खेळी मार्जराची नाटकी
**३**
लाविता हा सापळा हो नेटका
पाखराला कैदखाची नाटकी
**४**
रामदासी बाहुले हो बोलती
बोलणी बाहुल्यांची नाटकी
**५**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
२२-०८-२०१७
९१५८२५६०५४

sanjay ganesh kolhe

***!! लक्तरांत बांधलेली अब्रू !!**
अंधारल्या वस्तीत, आमची आईबहीण विटाळली जाते .
आणि तुम्ही फिरता, लेक वाचवाची मशाल पेटवून.
दुसऱ्याच सरण पेटवून, अना आपल जाळ विजवून !!
अरे धूर्तांनो अब्रू तिची लक्तरांत बांधलेली आलो रे मी पाहून !!

साखळ्या हाडमासाला टांगलेल्या, रवंथ करतात इंगळी विंचू.
जळलेल्या देहावर तु चालविला नांगर माझे काळीज थिजले.
आभाळ फाटले, वनवा पेटला, रक्ताची धार तिच्या मानेतून !!
अरे धूर्तांनो अब्रू तिची लक्तरांत बांधलेली आलो रे मी पाहून !!

कुविचाराचे जंत तुझ्या मनातिल जागोजागी दंश  करतात.
हाडामासाचा खच शोभवस्तू ठेव, आतड्याची तार विण्याला , नि कातडी पृथ्वीला लपेट.
माझं जिवन सार्थक होईल.
जिवंत लाव्हा तो, स्वप्नांचा इतिहास तळहातात बसली गुंडाळून !!
अरे धूर्तांनो अब्रू तिची लक्तरांत बांधलेली आलो रे मी पाहून !!

भंगलेल्या तुझ्या दुनियेत आई स्वार्थाची प्रिती
 नि रूधिराचीच असते विराट वस्ती.
सुर्य जळला चंद्र वितळला आम्ही दुसर जग निर्माण करतो.
सर्वांना आली सांगून, माणसाला पण आली टाळून !!
अरे धूर्तांनो अब्रू तिची लक्तरांत बांधलेली आलो रे मी पाहून !!
                  --- एस.जि.कोल्हे
                  रोहणखेड(आकोला)
09/02/2018 *** 9511922910

sanjay ganesh kolhe

!!  **षढयंत्र**  !!

(कोरेगाव हल्ला, मराठा मोर्चाची पार्श्वभूमी)

👉सत्तेचा फासा जाती पातीत टाकला

फुटीरता असुरांनी षढयंत्र रचला !!

आपल्याच लोकांच्या हातुन

रूधिरचा गळा दाबला !!



सत्तेसाठी जातीपातीत

गारूड्याचा खेळ खेळले !!

तरूणाच्या सडसडत्या रक्तात

देशद्रोहाचे बीज रोवले !!



हल्ल्यामागे जिहादी दलित,अतिरेकी मार्गाने

भारताला सुरंग लावू पाहतील !!

यांची आस माओवादी काही

शतकांपूर्वीच पाहत असतील !!



जाती पातीत वितुष्ट निर्माण करण्याचा

फास त्यांनी पूर्वीच आखला होता !!

योग्य धर्मावर प्रतिहल्ले झालेच नाही

म्हणून त्यांचा डाव फसला होता !!



विरोधातील तेढ नाहीसा

करून हारीच झाले पाहीजे !!

मोर्चा अना हल्ले स्वार्थापरी

ध्यानी आले पाहीजे !!



रंगारंगात वाद पेटले

फायदा घेतला जातीवाद्यान  !!

विखूरलेल्या समाजाला

बांधू समानतेच्या धाग्यानं !!

     बांधू समानतेच्या धाग्यानं...

                   ✍एस.जि.कोल्हे

               🏡रोहणखेड(आकोला)

03/01/2018**  9511922910