शिफारस

Started by Asu@16, February 14, 2018, 06:45:16 PM

Previous topic - Next topic

Asu@16

          शिफारस

शिफारसधारी अधिकाऱ्यांवर
उगारती सोटा
घेणाऱ्या पेक्षा देणाऱ्यांचा
गुन्हा नाही का मोठा ?
शिस्तभंगाची कारवाई
पोलिस अधिकाऱ्यांवर
हिंमत कोणाची कारवाई
करणार देवांवर !
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे
बिऱ्हाड पाठीवर
पोसलेले मस्तवाल
चरती रानभर
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यां करी
सळो की पळू
पोसलेले मस्त वळू
जणू चिकटल्या जळू
मोक्याच्या नियुक्त्या म्हणजे
दुधावरची साय
अन्य जागीच्या नियुक्त्या,
मसणात पाय
देवांच्या देवेंद्रा,
कसा तुझा न्याय !
जागे व्हावे देवा आता
करावा उपाय.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita