राधा ही बावरी !

Started by श्री. प्रकाश साळवी, February 15, 2018, 06:26:15 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

राधा ही बावरी !
-------------
कधी बाजूला कधी माघारी
नजर भिरभिरे दूर दूरवरी
भेटी साठी व्याकुळ झाली
कन्हय्या ! राधा ही बावरी
**
कुठे लपला कान्हा माझा?
कसा येईना प्रियकर माझा?
अजून कशी ना मंजूळ वाजे
गोड तुझी रे वेळूची बासरी?
**
व्याकुळ झाले मनोमनी या
चैन पडेना तुजवीण सखया
किती पाहू वाट तुझी मी
बघ घायाळ झाले मी अंतरी
**
क्षणोक्षणी वा-यास विचारी
कुठे असेल रे माझा श्रीहरी?
विनवून सांगते तुला राजसा
भेट दे रे येई आता झडकरी
**
वाट पाहूनी थकले मी रे
तहान भूक हरले मी रे
तु मोहन माझा राधा मी रे
हिच विनवणी तुज परोपरी
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
१४-०८-२०१७
०९१५८२५६०५४