शिवार

Started by कदम, February 17, 2018, 02:31:38 PM

Previous topic - Next topic

कदम


काळी माती शेतात माझ्या
कसदार माझं शिवार
पिक पिकते मातीत त्याच्या
त्यांचा घासघास चवदार
पशु पाखरे गिरक्या घाली
सांज सकाळीचा नित्य हा त्योहार
गोठ्यात हंबरणा-या गायी
कळपात मै-मैणारी करडी-शेळी
किलबिलाटात होते झुंजूमुंजू शिवार