चारोळी

Started by कदम, February 18, 2018, 10:10:07 AM

Previous topic - Next topic

कदम


गप्पागोष्टी माझ्यासोबत करायचीस
भेटीसाठी माझ्या तु झुरायचीस
मला सर्वस्वी तुझंच मानायचीस
ओठांवर नाव फक्त माझं आणायचीस
माझं हृदय,मन,श्वास..तुझेच म्हणायचीस
दुरावाताच विरहात हुंदका फोडायचीस
जखम होता मला किती तु रडायचीस
माझ्यासाठी सर्वकाही विसरायचीस
मला सर्वस्वी तुझंच मानायचीस
नसता समीप चोहीदिशा शोधायचीस
माझ्यावीना पाऊले अडखळत टाकायचीस
सुख दुखं माझी अलगद तु झेलायचीस
स्वप्नांना माझ्या हळुवार तु वेचायचीस
माझ्यासाठी स्वतःलाही विसरायचीस
आज सलतो मला तुझा दुरावा
का ऐवढं प्रेम तु माझ्यावर करायचीस ?