लागिर झाले जी

Started by maddy pathan, February 18, 2018, 10:14:22 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

येवुन मिठीत आज म्हणाली,
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा
मनाला दुसरं काही रुचत  नाही,


सांग ना रे हल्ली असं का होतय
मन सारखं तुझ्याकडे झेप घेतय
नाही ते आज था-यावर,
सारखं हिंडतय बघ वा-यार,


खरचं मला तुझी लागली ओढ,
का नाही लागणार तू आहेसच गोड,
चल ना रे कुठेतरी दूर जाऊ,
काही क्षण का होईना सहवासात राहू,


अरे असा लगेच रागावतोस काय,
तुझ्या शिवाय मला करमतच न्हाय,
सांग ना कधी नेतोस घरी,
माप ओलांडायचय मला येवून दारी,


चल ना लवकर ने ना रे मला
तुझ्या शिवाय काही सुचत नाही,
किती त्रास देशील मनाला
मनाला दुसरं काही रुचत नाही.


मॅडी✍.

व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉइन होण्यासाठी त्वरित संदेश पाठवा माझ्याताईंसाठी वेगळी ग्रुप आहे 7887766559