मिलन

Started by sanjweli, February 19, 2018, 04:58:51 PM

Previous topic - Next topic

sanjweli

बहरली रातराणी
तव मिलनाची आस
शृंगारली बेभान रात
का रुसला बरे
आज माझा चांद

धरे भास्कराची
भेट होई रे रोज
पसरे क्षितिजावरती
लाली गुलाबी
देई सांज-सकाळी
प्रीतीची आपल्या साद

सजली महफिल चांदण्यांची
प्रीतीची बघ रे पुनव आज
कसला हा दुरावा
काय चुकले रे माझे सांग

नको रे अबोला
बोल रे काहीतरी
मज जवळी का
सांग पांघरते लाज

नको परकेपणा
दे हातात माझ्या हात
तुटु दे रे बंधने सारी
रात मिलनाची आज खास.

©महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३
©sanjweli