कातरवेळ

Started by sanjweli, February 19, 2018, 05:01:16 PM

Previous topic - Next topic

sanjweli

कातरवेळी रे या अशा,
सतावती रे सखया
काळीज माझं सुनं सुनं,
ओढ तुझी जीवा
लागे मना हुरहुर
साद सुराचा मेळ घालतो आहे
   
नाहीस तू आता जीवलगा,
चुक कुठली बघ तुझी न् माझी
सांग कुठे लोपली ती गुलाबी स्वप्ने
हात तुझा असा हाती भासतो आहे

मळभ हा दाटला कसला,
भेट सांग तुला मला
का अशी विरहाची,
चंद्रकोरीला ग्रहण कसले,
सांग चांद पुनवेचा
उगवणार आहे

सडा प्राजक्ताचा अंगणी ता-यांचा
कुठेस रे तू शुक्रतारा नभातला
उरले न् बघ मी,माझीच आता
चांद करुन ओंजळीचा,
तुला रे शोधते आहे,

तू चकोर माझा
चांद आहे पुनवेचा
तुझ्यावीना न् दुसरे मागणे काही
प्रतिबिंब नव्याने शोधतो आहे.

©महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३
©sanjweli