शब्द वेडा मी

Started by Nmore901, February 20, 2018, 01:19:12 AM

Previous topic - Next topic

Nmore901

माहिती नाही,, सांगता येणार नाही ।

ते काय होतं,, फक्त आकर्षण की आणखी काही ।।

पण तिच्या जाण्याने,, आयुष्याला कलाटणी मिळालीय ।

अपयशाचा उतरता आलेख आज कुठं तरी स्थिरावलंय ।।
लक्ष खूप मोठं घेऊन धावतोय।
पण असं का वाटतंय की आपलं काहीतरी चुकतंय ।।

आज पुन्हा जाणीव झाली माझ्यातल्या मीची ।
पुन्हा एक नवीन सुरवात करून आस लागलीय मला  जिंकायची ।।
शब्द वेडा मी , कोनी कवी नाही ।
मन लिहितोय , पण लिहायचं आहे बरंच काही ।।