फुले

Started by kavirakesh, February 21, 2018, 11:58:57 AM

Previous topic - Next topic

kavirakesh

त्याच्या एका हातात फुलं होती
आणि एका हातात सूरी
आणि झाला तो मार्गस्थ
आपल्या मार्गाने...

वाटेत भेटेल त्याला तो
फुलांचं दान देत होता
जणू काही त्यांना
जीवदान देत होता....

तो चालला, बोलला प्रत्येकांशी
फुलांचा सुगंध होऊन
फुलं वाटणं गेलाय आता
त्याचा छंद होऊन

वाट संपत आली तरी
त्याचं फुलं वाटून झालं नाही
तो इतका गुंगला फुलांत
की सुरीकडे त्याचं लक्षच गेलं नाही
           
                  कवी- ₹!केश....मो.- 8956684445