नादात लिहितो

Started by शिवाजी सांगळे, February 22, 2018, 12:16:26 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नादात लिहितो

कधी मात्रात लिहितो, कधी छंदात लिहितो
बऱ्याचदा खुप काही, फक्त नादात लिहितो
       
प्रेमाचं मात्र सगळ, मी असं छान लिहितो
म्हणतो वाचून कुणी, खोट धादांत लिहितो

थोडेसे आताशा, काही लिहिता लिहिता
डकवण्या भावनेला, चिवट गोंदात लिहितो

सहजी विचार करता, केव्हा कसे लिहावे
हो, गुलाबी फुलांच्या, त्या सुगंधात लिहितो

मधुमेही असताना, वाचक भरपूर जरी 
हट्टामुळेच तयांच्या, मि गुलकंदात लिहितो

घेऊन सोबतीला, अलामत, रदिफ, मतला
गझलेतही मग एक, ओळ जादात लिहितो

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९