निसर्ग

Started by umesh bhisade 123, February 24, 2018, 06:12:41 PM

Previous topic - Next topic

umesh bhisade 123

विखुरती प्राणी त्यांच प्रेम
उनाड उन्हाच्या त्या वाटांवरती
लहरू दे नौका तुझ्या भावनांच्या
प्राणी ह्रदयांच्या लाटांवरती

डोलती झाडे हवेच्या सोबती
मोकाट रस्त्यांच्या त्या घाटांवरती
चिमणा चिमणी करती प्रेम
एकमेकांच्या थाटांवरती

पाण्याविना जाती दिवसे
गेले दिवस साठांवरती
डोळ्यामधनी थेंब टपकती
जसे झीरपे पाणी माठांवरती

लखलखती तारे हे नभामधनी
जसे हास्य सस्यांच्या ओठांवरती
उजडे सूर्य समुद्रकिनारी
कोमल फूल उमले देठांवरती

पळस उमले ह्या दिवसांमधनी
हंस खेळती नदी काठंवरती
रात्र झाली मनी लावती डोळे
जसा काळोख पडती पशू गोठांवरती

उमेश भिसडे....