सोपी कोडी

Started by शिवाजी सांगळे, February 26, 2018, 12:53:42 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सोपी कोडी

नाहीच मी कुठलाही कवी
गुण दोष माझ्यातले दावी

टिपतो जे स्वभाव जनातले
वाटे ओळख त्यांची व्हावी

लागले ग्रहण कसे उन्हाला
सावली त्याच्यावर पडावी?

फसले सारे चक्रात इथे 
घेता फेऱ्या गती तुटावी?

जीवन खेळ हा प्रश्नोत्तरे 
सोपी कोडी कशी सुटावी

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Deokumar

खुप छान ओळी आहेत

शिवाजी सांगळे

मनस्वी धन्यवाद देवकुमारजी, असाच स्नेह राहो...
शुभ दुपार
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९