अभिमान मला

Started by Deokumar, February 27, 2018, 06:52:30 AM

Previous topic - Next topic

Deokumar

अभिमान आहे मला
मराठी म्हणून जन्मल्याचा
आहे किती गोडवा
माझ्या बोलीचा

वळण किती तिचे डौलदार
मोत्याप्रमाणे अक्षर चमकदार
शब्दांमधुनी उमटती भाव
जसे ओठांतून अमृत प्यावं

आगळा मराठी संस्कृतीचा ठेवा
पेटवित ठेविला ज्ञानाचा दिवा
परंपरा मराठीची किती थोर
हास्य खुलविले मराठी मनावर

मराठीचा डौलचं न्यारा
ओलांडून टाकला समुद्र सारा
जपुनि वसा मराठीपणाचा
अभिमान मला मराठी असल्याचा
                     :-देवकुमार
https://dattagumatkar.blogspot.in