तो जळला नाही

Started by शिवाजी सांगळे, March 08, 2018, 12:48:21 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

तो जळला नाही

ऋतू ईतक्यात चळला नाही
तरूही धुळीत मळला नाही

गुलमोहोर अजूनी कसा तो   
झाडांनी पण माळला नाही

सावर आता तुझ्या नजरेला
पदर अजूनही ढळला नाही

फुका केली कथा व्यर्थ गेली 
सांगूनी अर्थ कळला नाही

जसा सोडून गाव तो गेला
फिरूनी मागे वळला नाही

जिवंतपणी पोळले व्यथांनी
सरणावर तोच जळला नाही

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Deokumar


शिवाजी सांगळे

खूप आभार, देवकुमारजी.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९