लळा शब्दांचा

Started by शिवाजी सांगळे, March 08, 2018, 03:59:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

लळा शब्दांचा

जिथे आसवांना येतो उमाळा
तिथे आठवांचा भरतो सोहळा

असता काळजी उरी जागताना
लवंडताच कसा लागतो डोळा

पोहचण्या आधी वैकुंठ नगरी
चालता वारीत दिसतो सावळा

उठाठेव कशा करू घोषणांची
दाऊन काम लोक करतो गोळा

ओळीं सोबत छापता गोड छबी
चाहत्यांचा फुकट्या भरतो मेळा

भले अशुद्ध अन् माना नियमबाह्य
लिहिताच शब्दांचा लागतो लळा

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९