==* घर काम *==

Started by SHASHIKANT SHANDILE, March 08, 2018, 05:01:43 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

तुला नाही नाती गोती
नाही घर बार
तुझ्याविना एकटा हा
अंगणाचा दार

काम वाटे तुला प्यारे
कामच संसार
बायको पोरं सोडून होतो
कामाला पसार

रात्री तू येतो उशिरा
बायको पाहे वाट
पोरगं वाढलं बापाविणं   
खोटी त्याची थाट

मरण सरण तुला नाही
पैशाची साठगाठ
कोण काय घेऊन जातो
हे मरण सपाट

मरणावर येणार नाही
अशीच आहे माज
तूच मोडली नाती सारी
समझून घे आज

सावरायला वेळ आहे
सोड खोटा राज
आपलीच माणसं कामाची
बाकी पैशांची गाज
-----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!