खरंच आज खूप एकटं वाटतंय

Started by snangareopan@gmail.com, March 08, 2018, 09:04:32 PM

Previous topic - Next topic

snangareopan@gmail.com

खरंच आज  खूप एकटं वाटतंय ,
आठवणींच्या ठेव्यात तुला शोधावंस  वाटतंय,
मग भरलेल्या डोळ्यांनी हळूच तुला बघावंसं  वाटतंय,
खांद्यावरती  डोकं ठेवून रडावसं वाटतंय,
आणि ,खरंच आज खुप एकटं वाटतंय.

हातामधीं हात घेऊन सवे तुझ्या,
पावसात चिंब भिजावस वाटतंय,
तुझ्या गोडं आठवणीत रमावस वाटतंय,
अन एकांतात थोडं रडावसं वाटतंय,
त्याच आसवात तुला शोधावंस वाटतंय,
आणि, खरच आज खूप एकटं वाटतंय.

विसरून या विरहाला,
वाऱ्यासवे धावावं वाटतंय,
हळूच  हलक्या सुरात तुला,
साद घालावीशी वाटतंय,
अन या तुझ्या विरहात सखे,
आज खरच खूप एकटं वाटतंय.   

---------
          सोपान नांगरे
          एम  फार्मसी, द्वितीय वर्ष
          (बी. व्ही . सी.   पि.  के)