नंतर नंतर

Started by शिवाजी सांगळे, March 09, 2018, 05:56:44 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नंतर नंतर

सोसला भार झाडाने फळांचा पिकल्या नंतर
सोडला निश्वास फांदीने फळे खुडल्या नंतर

बहाणे, हट्टाने उधळणे कधी मुक्त स्वतःला
सारे कळले सखे तुझ्या प्रेमात पडल्या नंतर

होतोय कमी दुरावा श्वासांच्या अंतरातला
होताच भेट तुझीमाझी मिठीत शिरल्या नंतर

पानगळ शहरात इथे होते रानात तिथे ही
हळूवार ऋतूने आपली कुस बदलल्या नंतर

मोठेपण गारव्याचे उमगते साऱ्यास हल्ली
एकाएकी उन्हाच्या या झळा वाढल्या नंतर

कोसळतात परतूनी सरी पावसाच्या येथे
देणे भरल्या मेघांचे शिल्लक फेडल्या नंतर

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Deokumar

अप्रतिम ओळी..... सर

शिवाजी सांगळे

मनस्वी धन्यवाद देवकुमारजी, असाच लोभ राहो.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९