परत पोरका झाला .....

Started by snangareopan@gmail.com, March 11, 2018, 11:42:27 AM

Previous topic - Next topic

snangareopan@gmail.com

परत पोरका  झाला .....

निरव शांतता अन,
संध्याकाळची वेळ,
लहानच वय अन,
आवड  तिची खेळ.

संथ वाहणारा वारा,
जणू साथी तिचा खरा,
वाऱ्यासवे धावी ती,
लाजवी जणू शूर वीरा.

हरवेल नशिबाला ती,
अशी उमेद तिच्या पंखात,
पण सटवीला पण लाजवेल,
अशी  रूढ समाजात.

परंपरेच्या विळख्यात,
गेले  भरडून तिचे जीवन,
झाली स्वप्ने अशीच बेचिराखं,
अन समाजच झाला दुःशासन.

कोवळी  कळी अशीच सुकली,
तेवता दिवा असाच विझला,
अन प्रगतीपथावरचा भारत,
असाच परत  पोरका झाला..
परत पोरका  झाला........