तुझ्यासाठी प्रेमवेडा

Started by snangareopan@gmail.com, March 11, 2018, 04:11:35 PM

Previous topic - Next topic

snangareopan@gmail.com

तुझ्यासाठी प्रेमवेडा

अलगद भरून आले डोळे,
अन ओल्या झाल्या पापण्या,
ओघळली आसवे गालावरून,
इतक्या आठवणी दाटल्या.

बंध तुटले हृदयाचे,
अन बांध फुटला  मनाचा,
नकळत भरले गच्च डोळे,
मग पूर डोळ्यातून आसवांचा.

कधी भास होई तू नसल्याचा,
अलगद मन कासावीस होते.
कधी त्या वळणावरच्या वाटेवर,
तुझ्या पावलांचे ठसे शोधण्यास जाते.

समजावतो कधी मनाला मी,
पुसतो ओल्या पापण्यांच्या कडा,
उभा अजूनही त्या वळणावरती,
आजही तुझ्यासाठी प्रेमवेडा...
तुझ्यासाठी प्रेमवेडा.
            ---सोपान नांगरे
                एम फार्मसी