फसवू नका मित्रांना

Started by शिवाजी सांगळे, March 12, 2018, 01:55:15 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

फसवू नका मित्रांना

डकवून ते खोटे डी पी
फसवू नका हो मित्रांना,
साहित्य असेल ढापलेले
दाखवू नकाच मित्रांना !

काव्य, लेख बरेच काही
दाखवा तो वारसा मित्रांना,
स्वलेखन सुद्धा असो कसे
कळूदेत तेही सर्व मित्रांना !

चोरी तर चोरीच असते
कळते कधी तरी मित्रांना,
आवडले न् पोस्ट केले
उल्लेखून सांगा मित्रांना !

आणखी एकच विनंती
करतो तुम्हा सर्व मित्रांना,
लिहा तुम्ही भले काही
उगाच टॅगु नका मित्रांना !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९