पायरी

Started by शिवाजी सांगळे, March 15, 2018, 12:56:00 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पायरी

आधी खरीदला, कळस तुज वैभवाला
अंती विचार केलाय मज बसविण्याला

तुला ऐकण्या विणा नाद अखंड तेथे
जप आधीच कानी ये मज एकटीला

बंद करता कवाडे.. रोजला नित्याने
गांजलेला विसावतो मज सोबतीला

भाग्य नमस्काराचे..जरी लाभे  तुला
काही फुले खूप धूळ मज बापडीला

भले शोभतो.....देवळात तु पांडुरंगा
वंदितात भक्त..आधी मज पायरीला

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९