नदी किनारा

Started by Ravikumar Borkar, March 16, 2018, 11:47:59 AM

Previous topic - Next topic

Ravikumar Borkar

    नदी किनारा..

पाहूनी तो ओलाचिंब
नदी किनारा देऊनी,
जातो मज तुझ्या
आठवणींचा शहारा..

वाहतो अंगावरूनी
हा थंडगार वारा
सांगुणी जातो जणू
स्पर्श तुझाच तो सारा...

पाहूणी वाहणाऱ्या
त्या मंद मंद लहरी
जणू तुझ्या प्रितीचीच
का ती मोहीणी..

पाहता पाण्यात
प्रतिबंब ते दिसे..
शोधते मन माझे
त्यात अशं काही तुझे...

ऐकता खळखळणारा
आवाज तो सारा..
जणू साद घालीतो
तुज हा नदी किनारा...

ओल्या मातीचा
गंध तो काही न्यारा,
जणू तुझ्या श्वासांचा
खेळ हा प्यारा...

गुलाबी होऊनी गेल्या
साऱ्या दिशा,
सांगुणीं जाती जणू
तुझीच का ती नशा..

पाहता परतणाऱ्या
घरी पक्षांचे ते थवे,
व्याकुळते मन माझे
तुझ्यासाठीच गं सवे...

सांगुणी जातो अर्थ
तुझाच तो किनारा
देऊनी जातो मज पुन्हा
तुझ्या प्रेमाचाच निवारा...।।

      रविकुमार बोरकर....
       अहमदनगर