नकोसे

Started by शिवाजी सांगळे, March 16, 2018, 01:40:12 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नकोसे

कोवळ्या वयाशी या नकोसे खेळ झाले
सोडून संगत आता बाल्य गहाळ झाले

प्रत्येक वेळी भ्याले मी धमकावण्याला
अत्याचार अताशा किती तरी वेळ झाले

कौतुकात फार न्हाले झाला जन्म तेंव्हा
घरच्यांसाठी मग मी लाडके बाळ झाले

करीत शौक ओरबाडले या तन मनाला
नात्यातले मज साठी आता काळ झाले

समजुन नाती खेळावया मी काय गेले
चाळा करीत अंगी गाळते लाळ झाले

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९