मी मात्र तुझ्यातच गुंतलेला असतो

Started by Basavraj Bhimanavaru, March 16, 2018, 07:14:36 PM

Previous topic - Next topic

Basavraj Bhimanavaru

तु दुर गेली असली तरी
मी मात्र तुझ्यातच गुंतलेला असतो,
तुझ्या एका भेटीसाठी
मी वेड्यासारखा झुरत असतो...

ऐकायला तु नसली तरी
मी मात्र बोलतच असतो,
मनातल्या भावनांना
माझ्याच सावलीला तु समजुन सांगत असतो...

तु परत येणार नसली तरी
मी मात्र वाट बघताच असतो,
वेडावलेल्या माझ्या मनाला
तो रस्त्यावरचा मृगजळही तुझ्यासारखाच भासतो...

तु माझी नसली तरी
मी मात्र तुझाच असतो,
तु कधीतरी माझी होशील
या आशेने मी पुन्हा पुन्हा तुझ्याच गुंतत असतो...

बसवराज भिमणवरू
9049373372

Basavraj Bhimanavaru
9049373372