गुढी पाडवा

Started by Asu@16, March 18, 2018, 09:03:08 AM

Previous topic - Next topic

Asu@16

              गुढी पाडवा

       गुढी पाडवा करू साजरा
       सण आनंदाचा असे गोजिरा
गुढी उभारून कष्टांची
मानवतेच्या मांगल्याची
पाडाव करून दुष्टांचा
दारिद्र्याच्या अरिष्टांचा
       गुढी पाडवा करू साजरा
       सण आनंदाचा असे गोजिरा
नवसंकल्पांची गुढी उभारू
पाणी वाचवू, वाचवू तरू
अंधश्रद्धेचे फास जाळून
विज्ञानाची कास धरू
        गुढी पाडवा करू साजरा
        सण आनंदाचा असे गोजिरा
सुखदुःखाच्या गुंफून माळा
भक्तिभावे गुढीस घाला
सर्वांसाठी सुख मागावे
वंदन करून मनोभावे
       गुढी पाडवा करू साजरा
       सण आनंदाचा असे गोजिरा
संवत्सर हे नवे 'विलंबी'
विनाविलंबी स्वागत करू
श्रीरामाचे स्मरण करून
सत्कर्माची वाट धरू
       गुढी पाडवा करू साजरा
       सण आनंदाचा असे गोजिरा

- अरूण सु.पाटील
(18.03.2018)
चैत्र शु. प्रतिपदा

https://www.facebook.com/AsuChyaKavita