कितिदातरी ...!

Started by श्री. प्रकाश साळवी, March 19, 2018, 12:34:11 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

कितिदातरी ...!
--------------
मी मलाच भेटलो कितिदातरी
मी नव्याने फुटलो कितिदातरी
**
देता देता असेच देत राहिलो
असे लूटत राहिलो कितिदातरी
**
बेसुर असेल गाणे माझे जरी
सूरात गात राहिलो कितिदातरी
**
तू भेटलिस नाही जरी मला
झुरत राहिलो कितिदातरी
**
आकंठ बुडालो संसार सागरात
पोहत राहिलो कितिदातरी
**
एकदा घोट प्यायलो सुखाचा
तहानलेला राहिलो कितिदातरी
**
तू आहेस माझ्या अंतरी जरी
शोधित राहिलो कितिदातरी
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
१९-०३-२०१८