हे क्षण...

Started by Deokumar, March 20, 2018, 09:01:45 AM

Previous topic - Next topic

Deokumar

हे क्षण....

कसे विसरु ही तुझी साथ
गुणगुणते ओठावर गीत
फुलांच्या सुगंधाने
मोहविते आपली ही आठवण

पावसाच्या थेंबांनी
हा मृदगंध दरवळतो
आठवणीने तुझ्या
मृदगंध गालावर हास्य खुलवितो

धरणाच्या किनार्‍यावर
आठवतोस पोहताना
रागवलास कितीदा
नाही दूर केले आम्हाला

आठवणीतील हे क्षण
जपून ठेवलेत मी
तुझा हा दुरावा
पापण्यात झाकला मी
              :-देवकुमार
https://dattagumatkar.blogspot.in