इच्छा

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 20, 2018, 09:57:50 AM

Previous topic - Next topic
*शिर्षक.इच्छा*

एक इच्छा होती मनातली
अप्सरे परी तू दिसायची
मुग्गीळून कधी तरी
तू आडोशाला रुसायची

कधी अस तर कधी तस
करत नेहमी तू हसवायची
शाळेतल्या जुन्या आठवणी
घेवून पुन्हा तुझ्यात फसवायची

मनमोहक तू नकळत
हवेची झुळूक असायची
वर्ग ही हिरवाईन नटायचा
पाहण्या जायचो अन तू ती नसायची

हिरमुसून चेहरा जायचा
पुन्हा नजर पुस्तकात जायची
एक एक ओळ वाचायचो कसातरी
डोळे स्तब्ध होऊन आठवण यायची

डोळ्यांच्या भुवया उंच व्हायच्या
नजर इकडे तिकडे भिरभिरायची
दिसली नाहीस तू मज मग
अलगद पापणी ओली व्हायची

✍🏻(कवी. अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

तुमच्या मनातला विरह कवी