तलावाकाठी..

Started by gaonkarsach, March 22, 2018, 12:59:11 PM

Previous topic - Next topic

gaonkarsach

आज खूप दिवसानंतर जावेसे वाटले गावच्या तलावाकाठी..
काय आहे ना..  फक्त तेथेच सुटतात माझ्या अंतरंगातल्या गाठी..

तिथल्या मृदगंधानें धुंद झालेली कमलदले, जणू काही माझं सुवासिक स्वागत करतातं..
आणि दैनंदिन सुखदुःखाच्या गुजगोष्टींनी ग्रासलेले माझे विचार, कुठच्या कुठे हरवतात..

आयुष्यातले एकटेपण हरवण्यासाठीही ह्या तलावासारखाच एक सवंगडी हवा..
ज्याच्या सहवासात आयुष्याचा एक एक मैल सर करता यावा!

बराच अवधी झाला, आता निघायची वेळ झाली..
तेवढ्यात तलावाकाठची एक गार झुळूक अलगद स्पर्शून गेली..

खोडकर कला असावी तिची ती 'पुन्हा ये' म्हणण्यासाठीची..
माझे विचारकल्लोळ मन तलावाकाठी विलीन करण्यासाठीची..

- सचिन गांवकर  (My unexpressed feelings)