* शिकारी *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 22, 2018, 10:46:36 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे



*सखे वेड लावी मज*
*गंध तुझ्या देहाचा*
*त्यात कहर होई*
*तुझ्या सोळा शृंगाराचा*

*करण्या शिकार तुझी*
*मी ऐटीत आलेलो*
*पण रुप पाहूनी तुझे*
*स्वतःच घायाळ झालो*

*स्पर्शाने तुझ्या सये*
*शमली वेदना अन्*
*अंगी वणवाच पेटला*
*भिडता ओठास ओठ*
*शिकारी खुद्द शिकार झाला*
*कवी - गणेश साळुंखे*
*Mob - 8668672192*