वादळ

Started by Gayatri Sonaje Jitendra, March 23, 2018, 04:02:31 AM

Previous topic - Next topic

Gayatri Sonaje Jitendra

▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬

जीवनातली ही वादळे
कधीच संपणार नाही
दाटलेल्या काळोखात
वाट ही सापडत नाही..॥

भरकटलेल्या हृदयाला
सावरणारा हात नाही
मनातील या दुःखाना
किनारा मिळाला नाही..॥

स्वप्नाच्या या दुनियेची
पानगळ होऊन गेली
आयुष्याची सुंदर होडी
सागरात या वाहून गेली..॥

सोसला ग वादळवारा
भावनांचा हा कोंडमारा
डोळयातील अश्रूना न
मिळाला कधी किनारा

      *सौ गायत्री सोनजे,नाशिक*✍🏻
▬▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬▬

Deokumar

खुप छान....

Gayatri Sonaje

काळजात पेरलेल्या घावावर फुंकर घालू तरी कशी
ओलावलेल्या माझ्या जखमांवर अत्तर लावू तरी कशी

Gayatri Sonaje

काळजात पेरलेल्या घावावर फुंकर घालू तरी कशी
ओलावलेल्या माझ्या जखमांवर अत्तर लावू तरी कशी

TkGhoul

हे माझे पहिले पोस्ट आहे