कळून गेले

Started by शिवाजी सांगळे, March 24, 2018, 04:34:29 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कळून गेले

पाहून दु:ख ते सुख वळून गेले
जाताना उगाच ते छळून गेले

वाट जो वळली चालतांना त्याची
सगळेच सोबतीचे पळून गेले

वेळ प्रसंगी नसता स्वकीय जवळी
नाही कुणी कुणाचे कळून गेले

लखलाभ हो तुम्हा थोरवी तुमची
वाहवा मिळता जरा चळून गेले

नजर कशी रे तुझी एवढी कपटी
कटाक्षात एका घर जळून गेले

तोडले अन्न पाणी जेव्हा मुळांनी
पान अखेरी हिरवे गळून गेले

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Deokumar

अप्रतिम.... कविता